महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना या पुरस्कारांसाठी मुहूर्त साधला गेला आहे. यात शिवसेना नेते व विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना उत्कृष्ट भाषणासाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मंगळवार 3 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
2018-19 : विधानसभा : उत्कृष्ट संसदपटू – बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप) उत्कृष्ट भाषण : नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप) विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू – नीलम गोहे , निरंजन डावखरे (भाजप) उत्कृष्ट भाषण : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप) 2019-20 – विधानसभा : उत्कृष्ट संसदपटू – प्रकाश आबिटकर, आशिष शेलार (भाजप) उत्कृष्ट भाषण : सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी) विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस) उत्कृष्ट भाषण : रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष) 2020-21 : विधानसभा : उत्कृष्ट संसदपटू – अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष), उत्कृष्ट भाषण : प्रताप सरनाईक, प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी) विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू – प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे (शिवसंग्राम) विधान परिषद : उत्कृष्ट भाषण – मनीषा कायंदे , बाळाराम पाटील (शेकाप) 2021-22 : विधानसभा उत्कृष्ट संसदपटू संजय शिरसाट , प्रशांत बंब (भाजप), उत्कृष्ट भाषण – सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप). विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू – अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत (भाजप) उत्कृष्ट भाषण : गोपीकिशन बाजोरिया, विक्रम काळे (राष्ट्रवादी) 2022-23 : विधानसभा : उत्कृष्ट संसदपटू भरत गोगावले, चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप) उत्कृष्ट भाषण – यामिनी जाधव, अभिमन्यू पवार (भाजप).