आंब्याच्या झाडाला सप्टेंबरमध्येच कैऱ्या!

कैरी आणि आंबे म्हणजेच उन्हाळ्याचा कालावधी, असे नैसर्गिक समीकरण आहे. पण, कृषी संशोधकांनी या समीकरणाला छेद दिला आहे. धुळ्यातील दत्तमंदिर चौकाजवळ आंब्याच्या झाडाला सध्या पैऱ्या लगडलेल्या आहेत. मोठय़ा संख्येने कैऱ्या असलेले हे झाड साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सदाशिव नगरात राहणाऱ्या रघुनाथ चौधरी यांनी त्यांच्या घराच्या आवारात सात वर्षांपूर्वी हे झाड लावले होते.

निसर्गाने बारा महिन्यात विविध ऋतू निर्माण केले आहेत. तसेच प्रत्येक ऋतूत विशिष्ट फळे निर्माण होतात. गोड-आंबट चवीची पैरी, रसाळ आंबे बाजारात आले म्हणजे उन्हाळ्याचा काळ सुरू आहे, असे नैसर्गिक समीकरण आहे. पण, कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाने आता नैसर्गिक समीकरणांना छेद दिला आहे.