दारुड्या प्रवाशाने बेस्ट बसचे स्टेअरिंग फिरवल्याने बसने वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना आज रात्री लालबाग परिसरात घडली. या घटनेत 8 जण जखमी झाले आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आज रात्री बेस्टची 66 नंबरची बस लालबाग परिसरात आली. बस गरमखाडा येथे सिग्नलला उभी होती. तेव्हा बस चालक कमलेश प्रजापतीच्या बाजूला दत्ता शिंदे नावाचा प्रवासी उभा होता. दारूच्या नशेत असलेल्या शिंदेने बसचे स्टिअरिंग बळजबरीने डाव्या बाजूला फिरवले. त्यामुळे बसने दोन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल आणि पादचाऱ्यांना धडक दिली. अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.