>> प्रसाद नायगावकर
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार आहे. यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहून आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा जोरदार प्रवाहित झाला असून जोरदार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याने सततच्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे