Kerla #Metoo- माझेही न्यूड फोटो घेतले..; अभिनेत्याचा दिग्दर्शक रंजित यांच्यावर गंभीर आरोप

महिलांवरील अत्याचारामुळे संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टी हादरली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर अनेक कलाकारांनी आपली मते मांडली आहेत. यावेळी लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येताच मल्याळम इंडस्ट्री बॉडी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) चे अध्यक्ष मोहनलाल यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र एकीकडे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या बातम्या समोर येत असताना आता मल्याळम सिनेमात काम करणाऱ्या एका अभिनेत्याने एका दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्याने चित्रकट दिग्दर्शक रंजित यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी तक्रारी नोंदविली आहे. दिग्दर्शकाने मला 2012 मध्ये बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. जिथे त्यांनी मला कपडे काढायला सांगितले. यानंतर दिग्दर्शकाने माझे न्यूड फोटो क्लिक केले होते. यादरम्यान माझे नग्न फोटो एका प्रसिद्ध महिला अभिनेत्रीला पाठवण्यात आले होते. असा दावा ही अभिनेत्याने यावेळी केला होता. मात्र अभिनेत्याने केलेल्या आरोप चित्रपट दिग्दर्शक रंजित यांनी फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्याच्या तक्रारीवरुन कोझिकोडच्या पोलिसांनी रंजित यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चित्रपट दिग्दर्शक रंजित यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा दुसरा गुन्हा दाखल झाला असल्याचे कोझिकोड शहर पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान आधीही एका बंगाली अभिनेत्रीने दिग्दर्शक रंजित यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीला 2009 मध्ये ‘पलेरी माणिक्यम’ चित्रपटात काम करण्याची संधी देण्याच्य़ा हेतून बोलावून दिग्दर्शक रंजितने अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे तिने म्हंटले होते. यावेळी अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन, रणजीतविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत लैंगिक छळाचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता या आरोपांनंतर रंजित यांनी केरळ चलचित्र अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.