IPL 2025 मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये साउथ दिल्ली सुपरस्टार्स (SDS) संघाच्या एका खेळाडूने नॉर्थ दिल्ली संघाविरुद्ध सहा चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकत आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
क्रिकेटवेड्या हिंदुस्थानातील प्रत्येक खेळाडूचे देशासाठी आणि IPL खेळण्याचे स्वप्न असते. त्यामुळे खेळाडू चमकदार कामगिरी करून फ्रेंचायझींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. कारण आयपीएलचे दार उघडले की देशासाठी खेळण्याची संधी निर्माण होते. त्यामुळे दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (DPL) खेळाडू षटकार आणि चौकारांची आतषबाजी करताना पहायला मिळत आहेत. अरूण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या साउथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नॉर्थ दिल्ली या सामन्यात साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाचा फलंदाज प्रियांश आर्य याने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याने मनन भारद्वाजच्या 12 व्या षटकात सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले आहेत. तसेच त्याने फक्त 50 चेंडूंमध्ये 120 धावांची तुफान खेळी केली. प्रियांशने दुसऱ्या विकेटसाठी आयुषसोबत 286 धावांची विक्रमी भागीदारी केली.
6️⃣
There’s nothing Priyansh Arya can’t do #AdaniDPLT20 #AdaniDelhiPremierLeagueT20 #DilliKiDahaad | @JioCinema @Sports18 pic.twitter.com/lr7YloC58D
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 31, 2024
प्रियांशने DPL मधील आपले दुसरे शतक 15 व्या षटकात पूर्ण केले आहे. तसेच प्रियांश डीपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने 8 सामन्यांमध्ये 576 धावा केल्या आहेत.