भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर 19 संघाची (India U19 Squad for Australia vs Series) घोषणा केली आहे. या संघात टीम इंडियाचे माजी प्रशिक्षत राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड याला स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा अंडर-19 संघ ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघाविरुद्ध एकदिवसीय आणि चार दिवसीय सामने खेळणार आहे. या दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी समितला टीम इंडियात संधी मिळाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 मालिका 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
ज्युनियर निवड समितीने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाच्या अंडर-19 संघाची निवड केली आहे. या मालिकेत पुद्दुचेरी आणि चेन्नईमध्ये तीन 50 षटकांचे सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील. ज्यामध्ये यूपीचा स्टार फलंदाज मोहम्मद अमानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अंडर-19 संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या मालिकेत मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
🚨 NEWS 🚨
India U19 squad and fixtures announced for multi-format home series against Australia U19.
Squad for one-day series: Rudra Patel (VC) (GCA), Sahil Parakh (MAHCA), Kartikeya KP (KSCA), Mohd Amaan (C) (UPCA), Kiran Chormale (MAHCA), Abhigyan Kundu (WK) (MCA), Harvansh…
— BCCI (@BCCI) August 31, 2024
समित हा अष्टपैलू खेळाडू असून महाराजा टी-20 KSCA स्पर्धेत शानदार षटकार मारल्यामुळे त्याच्या नावाची चर्चा होती. म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना त्याने सात सामन्यांत 82 धावा केल्या आहेत, ज्यापैकी गुलबर्गा मिस्टिक्सविरुद्ध 33 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ पुढीलप्रमाणे आहे. अंडर-19 संघ – रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) , समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत आणि मोहम्मद अनन.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार दिवसीय मालिकेसाठीचा संघ अंडर-19 संघ – वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशी सिंग पंगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग आणि मोहम्मद अनन.