मिर्झापूरच्या तिसऱ्या सीजनचा बोनस एपिसोड रीलीज झाला आहे. पण त्यामुळे चाहत्यांचा मोठा प्रेक्षकभंग झाला आहे. कारण या एपिसोडमध्ये मुन्ना भैय्या परत येईल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण या सीजनमध्ये डिलिटेड सीन दाखवून मिर्झापूरच्या फॅन्संना चुना लावलाय का अशी विचारणा होते आहे.
Month-end bonus? Munna Bhaiya ne prabandh kar diya hai 😎🔥#MirzapurOnPrime, Bonus Episode, Watch Now:https://t.co/vzT39IgnnV pic.twitter.com/Z4Umdf7yRI
— prime video IN (@PrimeVideoIN) August 30, 2024
मिर्झापूर वेबसीरीजचा तिसरा सीजन या वर्षी रीलीज झाला. अॅमेझॉन प्राईमवर ही सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसीरीज ठरली. असे असले तरी प्रेक्षकांचा तिसऱ्या सीजनमुळे अपेक्षाभंग झाला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. मुन्ना त्रिपाठीच्या अंत्यसंस्कारापासून तिसऱ्या सीजनची सुरुवात होते. ज्या पंकज त्रिपाठीमुळे मिर्झापूर प्रेक्षकांनी उचलून धरला, त्याच पंकज त्रिपाठीचा स्क्रीन टाईम कमी केल्यामुळे चाहते नाराज झाले होते.
Munna bhaiya ko comeback karana chahiye tha. RIP mirzapur season 4
— The_Truth_Speaker (@Truthspeaker448) August 30, 2024
There is no scene of munna, He only narrates the Deleted scenes. Two of the deleted scene are really amazing, Rest explains why they were deleted.
— cricX (@Thirdman_source) August 30, 2024
Kuch nahi bas makers ko pata chal gaya ki Munna bhaiya ke bina kuch nh ho sakta , season 3 bahut hi bakwas tha . Inhone ne Munna bhaiya ko maar ke galti ki . Mai Guddu bhaiya ka Mirzapur se hi fan ho gaya tha aur season 3 ke baad ab yeh pasand nahi aa raha . What a waste
— Jeet (@jeet40_) August 30, 2024
त्यात मुन्ना त्रिपाठी नसल्याने प्रेक्षकांचा आणखीन हिरमोड झाला होता. या सगळ्याची भरपाई करावी म्हणून निर्मात्यांनी बोनस एपिसोडचा घाट घातला होता. खुद्द गुड्डू पंडितने याची घोषणा केली होती. ऑगस्ट संपत आला होता तरी हा बोनस एपिसोड रीलीज झाला नाही. म्हणून 30 ऑगस्टला हा एपिसोड प्राईमवर दाखल झाला. त्यापूर्वी या बोनस एपिसोडची जाहिरात खुद्द मुन्ना त्रिपाठीने केली. त्यामुळे या सीजनमध्ये मुन्ना त्रिपाठी परतणार का अशी उत्सुकता होती.
हा एपिसोड स्ट्रीम झाल्यानंतरही अनेकांनी अपेक्षाभंग झाल्याची तक्रार केली. कारण या बोनस एपिसोडच्या नावाने निर्मात्यांनी प्रेक्षकांना डिलीटेड सीन दाखवले. यापूर्वी मिर्झापूरचे डिलीटेड सीन हे युट्युबवर टाकले जायचे. पण आता बोनस एपिसोडच्या नावाने डिलीटेड सीन दाखवल्याने प्रेक्षकांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.