अभिनेता आर. माधवनने एका प्रसिद्ध पान मसाला ब्रँडची जाहिरात करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या जाहिरातीसाङ्गी पान मसाला कंपनीने माधवनला कोटय़वधी रुपये देऊ केले होते. परंतु माझ्यामुळे माझ्या चाहत्यांना कोणतेही नुकसान होईल, असे काम मी करणार नाही. त्यामुळे अशा कोणत्याही ब्रँडचे समर्थन मला करायचे नाही, अशा शब्दांत माधवनने जाहिरात नाकारली आहे. याआधी अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान पान मसालाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पान मसाला कंपनीला एक स्थानिक प्रसिद्ध चेहऱयाची आवश्यकता होती. त्यामुळे कंपनीने आर. माधवन यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, माधवनने प्रस्ताव फेटाळल्यानंतर कंपनी आता एका नव्या चेहऱयाच्या शोधात आहे, असे समजते.