हिंदुस्थानी वंशाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागील 85 दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. अवघ्या जगाला सुनीता यांची चिंता वाटत आहे. अशातच सुनीता यांची आई बोनी पांडया यांनी प्रतिक्रिया दिली. लेकीला पृथ्वीवर परतायला विलंब होत आहे, पण याची चिंता वाटत नसल्याचे बोनी पांडया यांनी सांगितले. सुनीताची रोज आठवण येत असल्याचेही त्यांनी म्हटले. एका मुलाखतीत बोनी पांडया म्हणाल्या, सुनीता एक अनुभवी अंतराळवीर आहे. मी तिला काय सल्ला देणार. तिला माहीत आहे काय करायचे ते. ती 400 दिवस अंतराळात राहिली आहे. सुनीता यांच्याकडे 20 वर्षांचा अनुभव आहे. सुनीता यांच्या स्पेस यात्रेदरम्यान 2022 साली सुनीता यांची आई बोनी पांडया यांनी एक पुस्तक लिहिले. ‘लिटिल टेल, बिग टेल्स’ असे पुस्तकाचे नाव आहे.