
मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी 1 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामकाजासाठी उपनगरीय मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तसेच माटुंगा आणि मुलुंड दरम्यान सकाळी 10.14 ते 3.18 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
मेगाब्लॉक दरम्यान धीम्या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. मुलुंडच्या पुढे सर्व धीम्या गाड्या जलद मार्गावरून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. धीम्या गाड्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
ठाण्याहून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान जलग मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 दरम्यान सुटणाऱ्या सर्व गाड्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा धावतील.