
सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे ही आगळीवेगळी जोडी नव्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या कॉमेडी अंदाज आणि विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. बऱ्याच काळानंतर सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर ‘एक डाव भुताचा’ मांडणार आहेत.
या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे एकत्र आले असून येत्या 4 ऑक्टोबरला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च झाले आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत दिसून येत असून त्याला भूतांची मस्ती, हास्याची लहर एकाच वेळी, काहीतरी भयानक येणार आहे कॅप्शनसह सादर केले आहे.
View this post on Instagram
रेवा अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संदिप मनोहर नवरे आणि छायांकन गौरव पोक्षे यांनी केले आहे. तसेच प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली.
या चित्रपटात मकरंद अनासपुरे , सिद्धीर्थ जाधव यांसोबत सहकलाकार नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, अभिनेत्री मयुरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे सुद्धा या चित्रपटात अनेक वेगवेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटातील गाणी सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहे.