सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. मात्र मिंधे सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराचे वारे या पुतळ्यालाही लागले आणि हा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून मिंध्यांनी आपली चूक कबूलही करत या प्रकरणी समिती नेमली. यावरून विधानसपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना चार सवाल केले आहेत.
अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना बोचरे सवाल केले. आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली. हा विषय महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला असल्याने काही विषय मांडतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असतील तर यावर उत्तर देतील, असे म्हणत दानवे यांनी चार सवाल उपस्थित केले.
1. वास्तूविशारद आणि शिल्पकार या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का?
2. किती उंचीचा पुतळा येथे उभारायचा, याचा शास्त्रीय अभ्यास झाला होता का? खालील बेटाची ताकद जोखून हा पडलेला पुतळा उभा झाला होता का? की कोणाची तरी राजकीय महत्वाकांक्षा म्हणून मनाने उंचीचा आकडा सांगितला गेला?
3. राजकोटवर आजघडीला उपलब्ध बांधकाम सामुग्री वापरून उभारण्यात आलेली लाल भडक तटबंदी किल्ल्याच्या मूळ अवशेषांचे वाटोळे करून उभारली गेली का?
4. विद्यमान सदस्यांच्या प्रेमापोटी काही विद्वान माणसे मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली आहेत का?
आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली. हा विषय महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला असल्याने काही विषय मांडतो आहे. मुख्यमंत्री @mieknathshinde शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असतील तर यावर उत्तर देतील..
१.… pic.twitter.com/8wDr4pNC7f
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 30, 2024