सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एका स्ट्रक्चरल कन्सल्टंटला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर गुन्हे शाखा आणि मालवण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कोल्हापुरातील चेतन पाटील याला पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची मालवण पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
या प्रकरणातील FIRमध्ये नाव असलेल्या पाटील यांनी यापूर्वी प्रकल्पासाठी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असण्याचे नाकारले होते आणि त्यात आपला सहभाग नसल्याचा दावा देखील केला होता.
सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा दुपारी 1 च्या सुमारास कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाल्यानंतर नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ही घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत.