राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समित्यांवर समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने काल दोन समित्यांची घोषणा केली. त्यानंतर आज भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ञ यांचा समावेश एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केली आहे.