
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजितदादा गटानेही आज राज्यभरात राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत शिवरायांची माफी मागितली.