शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. मालवण राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली. तिथे जाऊन संजय राऊत पाहणी करणार आहेत. त्यानंतर मालवण शासकीय विश्रामगृह (आरसेमहाल) येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. मालवण कोळम येथील समर्थ मंगल कार्यालयात शिवसैनिकांच्या मेळाव्यालाही संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.