आयपीएलच्या आगामी 18 व्या हंगामासाठी सर्व संघांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. LSG ने झहीर खानला आपल्या ताफ्यात घेऊन आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. तसेच इतर फ्रँचायझींच्या हालचालींना आता वेग आला आहे. ऑक्शन पूर्वी रोहित शर्माला मुंबई इंडियन्स करारमुक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र रोहित शर्माच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्सला IPL 2024 मध्ये हार्दिकं पंड्याच्या नेतृत्वात म्हणावा तसा खेळ करता आला नाही. त्यामुळे सर्व स्तरातून हार्दिक पंड्यावर तसेच मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटवर टीका करण्यात आली. तसेच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला कायम ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच रोहित शर्माच्या सर्व मागण्या मान्य करण्यास मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट तयार असल्याची चर्चा सोशल मीडियार रंगताना पाहायला मिळत आहे. मात्र त्याच्या खांद्यावर पुन्हा कर्णधार पदाची जबाबदारी सोपावणार का नाही यबाबत कोणातीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
IPL 2024 मध्ये रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच रोहितच्या चाहत्यांकडून हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आल्याच्या घटना चालू सामन्यांमध्ये घडल्या होत्या. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सला प्रत्येक सामन्यात विजयासाठी झुंजावे लागले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सला गुणातालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले.