
बदलापूर, ठाणे, नगरमधील अल्पवयीन मुलींवरील घटना ताज्या असतानाच आता मुंबईत 9 वर्षाच्या चिमुरडीवर बापाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
जून महिन्यात ही घटना घडली होती. घरात कुणीही नसल्याची संधी साधत बापाने 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. नुकतीच मुलीने आईला बापाच्या कृत्याबद्दल सांगितले.
मुलीने अत्याचाराचा खुलासा केल्यानंतर बुधवारी आईने तात्काळ दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात BNS च्या कलम 65 (2), 68 (A) आणि POCSO च्या कलम 4,10,12 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.