विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्यात सध्या बदल्यांचे वारे सुरू आहेत. नुकतेच पोलीस दलातील बदल्यासत्र पार पडल्यानंतर आता राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आता स्मार्ट सिटी पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर अभिनव गोयल यांची हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या?
1. अभिनव गोयल यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदी नियुक्ती
2. विनायक महामुनी यांची नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
3. सतीशकुमार खडके यांची जिल्हा परिषदेच्या बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
4. सौम्या शर्मा चांडक यांची स्मार्ट सिटी नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
5. मनीषा आव्हाळे यांची स्मार्ट सिटी पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
6. कुलदीप जंगम हे सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त
7. प्रदीपकुमार डांगे यांची नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तपदी नियुक्ती