संतप्त शिवसैनिकांनी राणे पितापुत्राच्या प्रतिमेला चपलांनी मारत लाथांनी तुडवलं, पुण्यात आक्रमक आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील पूर्णाकृती पुतळा भ्रष्टाचारी मिंधे सरकारमुळे कोसळला गेला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता नारायण राणे पितापुत्रांनी आकांडतांडव करून स्थानिकांना धमकी दिली. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाले. बालगंधर्व रंगमंदिराजवळ झाशी राणी चौकात सरकारचा धिक्कार करून राणे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन केले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला.

‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार करून सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास भ्रष्टाचारी सरकार जबाबदार आहे. या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे गेले यावेळेस स्थानिकांना नारायण राणे आणि त्यांच्या पुत्राने धमक्या दिल्या. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. शिवसैनिकांनी राणे पितापुत्राच्या प्रतिमेला चपलांनी मारत लाथांनी तुडवले.

Photo – राणे पितापुत्रांविरोधात शिवसैनिक आक्रमक, पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन

शिवसेना पुणे शहराचे वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला शिवसेना उपनेता सुषमा अंधारे, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे उपशहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, अनंत घरत, शहर संघटक किशोर रजपूत , विलास सोनवणे, महिला सहसंपर्क संघटक कल्पना थोरवे, शहर संघटिका पल्लवी जावळे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले, सचिन भगत, सागर माळकर, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, युवराज परीख, चेतन चव्हाण, निलेश जठार, राजेश मोरे, प्रसाद काकडे, चंदन साळुंखे, नागेश खडके, नंदू येवले, अमृत पठारे, रोहिणी कोल्हाल, सुनीता खंडाळकर, ज्योती चांदोरे, सोनाली जुनवणे, शितल जाधव, करुणा घाडगे, निकिता मारटकर, प्रवीण भोर, वैशाली बनशेत, नितीन दलभंजन, संतोष भूतकर, मुकुंद चव्हाण, अजय भुवड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.