भाभा अणुसंशोधन केंद्रातील कनिष्ठ शास्त्रज्ञाचा रामेश्वरम येथे अपघाती मृत्यू

मध्य प्रदेशातील बीना शहरातल्या कनिष्ठ शास्त्रज्ञाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा अपघात तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला. 26 ऑगस्टला बाईकला मागून आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या शास्त्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशच्या बीना शहरात राहणाऱ्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

आदित्य श्रीवास्तव (28) असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो मागच्या वर्षी भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये झाला होता. तो कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प, तामिळनाडू येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता. 2023 रोजी तो नोकरीत रूजू झाला.

आठ दिवसांपूर्वी आदित्य बीना येथील त्याच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या शाळेत मोटिवेशनल स्पीच आणि करिअर गायडन्स विद्यार्थ्यांना केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, देशासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती पाहिजे, शिक्षकांचा सन्मान करा आणि वेळेचा सदुपयोग करा, असे मार्गदर्शन केले होते. त्यावेळी तो आपल्या मित्रांनाही भेटला होता.

आदित्य याचा मृतदेह कुटुंबिय विमानाने भोपाळला घेऊन आले. बुधवारी दुपारी इटावा मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्यचे वडिल केके श्रीवास्तव रेल्वेतून निवृत्त आहेत आणि आई सरकारी शाळा बेलई येथे शिक्षिका आहे. लहान भाऊ अपूर्व श्रीवास्तव इंदूर येथून गेट, आयइएसती तयारी करत आहे.