उल्हासनगरचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

बदलापूरमध्ये लैंगिक शोषणाची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगर महापालिकेत महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. कार्यालयात वक्तव्य केल्याने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याविरोधात उल्हासनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिंधे सरकारच्या काळात राज्यातील महिला कुठेच सुरक्षित नसल्याचे उघडकीस आले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता चक्क अतिरिक्त आयुक्तांविरुद्ध पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी लगट केल्याचे पीडित फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित आयुक्त हे पीडित महिला कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावून तू छान दिसतेस, तुझे कपडे खूप छान आहेत अशा कमेंट करायचा. तुम्ही माझे वरिष्ठ आहात, तुम्ही असे माझ्याशी बोलू नका असे पीडित महिला कर्मचारी या अधिकाऱ्याला बोलायची. मात्र हा लपंट अतिरिक्त आयुक्त गेल्या दीड वर्षापासून सतावत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

…तो मी नव्हेच

विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त यांच्या केली असल्याचे समोर आले आहे. असे असताना विरोधात अन्य 10 महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार एकाही महिलेची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. दरम्यान, माझा काहीही संबंध नाही, खरं काय ते पुढील तपासात समोर येईल, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

जुन्या विशाखा समितीचा कार्यकाळ बाकी असताना नियमबाह्य नवीन विशाखा समिती गठित करण्यात आली. वरिष्ठ महिला अधिकारी असताना बाहेरच्या महिला अधिकारी अध्यक्षा म्हणून घेण्यात आल्या. विशाखा समितीस व आयुक्तांना नवीन समितीद्वारे घेतलेला निर्णयाची दोन वेळा मागणी करूनही देण्यात आली नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सागर कदम (पीडित महिलेचे वकील)