Bangladesh Crisis – भयंकर! महिला पत्रकाराचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला

बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसतं नाहीत. रोज वेगवेगळ्या घटना समोर येत असून बांगलादेशातील गंभीर वास्तव जगासमोर येत आहे. अशातच एका महिला पत्रकाराचा मृतदेह ढाका येथील तलावात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ढाका ट्रिब्युन या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आज (28 ऑगस्ट) बांगलादेशची राजधानी ढाका येथील हातीरझिल तलावात एका महिला टीव्ही पत्रकाराचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतला आहे. सारा रहनुमा (वय 32) असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती गाझी टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी काम करत होती. या खळबळजनक घटनेवरून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र साजिब वाजेद यांनी ट्वीट करत हा बांगलादेशातील अभिव्यक्ती स्वात्रंत्यावर आणखी एक क्रुर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

साजीब वाजेद यांनी ट्वीटमध्ये (X) म्हटलं आहे की, गाझी टीव्ही न्यूजरूम एडिटर सारा रहनुमा यांचा मृतदेह आढळून आला आहे. ढाका शहरातील हातीरझिल तलावत तिचा मृतदेह सापडला. बांगलादेशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा आणखी एक क्रूर हल्ला आहे. गाझी टीव्ही हे गोलाम दस्तगीर गाझी यांच्या मालकीची धर्मनिरपेक्ष वृत्तवाहिनी असून त्यांना अलीकडे अटक करण्यात आली होती,  असे साजीब वाजेद यांनी म्हटले आहे.