IPL 2025 साठी सर्व संघांनी कंबर कसून संघ बांधणीला सुरुवात केली आहे. अशातच लखनऊ सुपर जायंट्सने टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची मेंटोर पदी निवड केली आहे. लखनऊने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना याबाबात माहिती दिली.
लखनऊ सुपर जायंट्सचा मागील हंगामातील (IPL 2024) खेळ साधारण राहिला होता. के एल राहुलच्या नेतृत्वात LSG ला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे आगामी हंगामासाठी लखनऊने आत्तापासूनच डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून झहीर खानवर मेंटोरपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. IPL 2024 मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. तेव्हापासून लखनऊ संघाचे मेंटोरपद खाली होते. सध्या लखनऊच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी जस्टिन लॅंगर यांच्यावर आहे. त्याचबरोबर लान्स क्लुसनर आणि अँडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. आता त्यांच्या जोडीला मेंटोर पदी झहीर खानची निवड झाली आहे. झहीर खानवर मेंटोर पदा व्यतिरिक्त अन्य जबाबदारी सुद्धा असणार आहे.
Welcome to the Super Giants family, Zak! 💙 pic.twitter.com/0tIW6jl3c1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
झहीर खानने 2008 मध्ये आयपीएलमध्ये आपला पहिला सामना खेळला होता. त्यानंतर 2017 पर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल गाजवली. त्याने 100 सामन्यांमध्ये 102 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 17 धावांमध्ये 4 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.