घरात खेचून मारून टाकेन, नारायण राणेंच्या या विधानाचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार

भाजप खासदार नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावर शिवप्रेंमींना धमकी दिली. एकेकाला घरात खेचून रात्रभर मारून टाकेन असे नारायण राणे म्हणाले, यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. राज्याचा खेळखंडोबा केला आहे, असेही आव्हाड म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करून अव्हाड यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची ! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी..!

एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची. भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांनाही लाज वाटेल असं आज कृत्य केलंय. पक्षाला वाचवायच्या नादात यांची गुंडगिरी एवढी वाढलीये की राज्यातील नेत्यांनाही धमकावण्यापर्यंत यांची मजल गेलीये. बरं आता यांना वाचवायला कायदा आणि सुव्यवस्था डोळे झाकून राहणार यात काही नवल नाही.राज्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय..! असेही आव्हाड म्हणाले.