ड्रग्ज तस्करी करणाऱ्या नायजेरियन महिलेवर झडप टाकून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. आलिशा केम असे नायजेरियन महिलेचे नाव आहे.
शमशाद बेगम प्रवासादरम्यान आपली पर्स रिक्षातच विसरल्या. पर्स शोधण्यासाठी त्यांनी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना नायजेरियन महिला त्याच रिक्षेतून प्रवास करताना दिसली. शमशाद यांनी नायजेरियन महिलेला पर्सबाबत विचारणा केली असता तिने घाबरून पळ काढला. त्यावेळी शमशाद यांनी स्थानिकांच्या मदतीने आलिशाला पकडून न्हावा-शेवा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांना तिच्याकडून तब्बल 43 लाख रुपयांचे कोकेन कॅप्सूल जप्त केले आहेत.