गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन चाहत्यांना अॅपलच्या इव्हेंटची उत्सुकता होती. अखेर कंपनीने या इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. अॅपलच्या या इव्हेंटला यंदा ‘इट्स ग्लोटाइम’ नावाची थीम देण्यात आली आहे. हा इव्हेंट अमेरिकेत 9 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्या वेळी हिंदुस्थानात रात्रीचे 10.30 वाजलेले असतील. कंपनी या इव्हेंटमध्ये आपली बहुचर्चित आयफोन-16 सीरिज लाँच करणार आहे. या सीरिजमध्ये आयफोन-16, आयफोन-16 प्लस, आयफोन-16 प्रो आणि आयफोन-16 प्रो मॅक्स हे चार फोन लाँच करणार आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर इव्हेंट पाहता येऊ शकेल.
संभावित किंमत
आयफोन-16 : 799 डॉलर (67,100 रुपये)
आयपह्न-16 प्लस : 899 डॉलर (75,500 रुपये)
आयपह्न-16 प्रो : 1099 डॉलर (92,300 रुपये)
आयपह्न-16 प्रो मॅक्स : 1199 डॉलर (1,00700 रुपये)
आयफोन-16ची संभावित फीचर्स
आयफोन-16मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. आयफोन-16 प्लसमध्ये 6.7 इंचाची स्क्रीन, आयफोन-16 प्रोमध्ये 6.3 इंचाची स्क्रीन तर आयफोन-16 प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचाची स्क्रीन दिली जाणार आहे. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसमध्ये 2 एक्स ऑप्टिकल झूम, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिला जाणार आहे.