गेल्या काही वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेने एअरलाईन्स कंपन्या नाहीत. देशांतर्गत असे अनेक हवाई मार्ग आहेत, तिथे एक-दोन कंपन्यांची विमाने उडत आहेत. विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा कमी झाल्याने तिकीट दरात वाढ झाली आहे.
2019 मध्ये देशांतर्गत 55.2 टक्के हवाई मार्ग असे होते, ज्यावर फक्त एकच एअरलाईन्सची विमाने उडायची. एप्रिल 2024 पर्यंत ही संख्या 69.2 टक्के झाली. म्हणजे 30.8 टक्के हवाई मार्ग असे होते, जिथे केवळ एक किंवा दोन विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे विमान तिकीट दरात वाढ झाली. कोविडच्या साथीनंतर दिल्ली-मुंबई मार्गावरील 2019 ते 2023 दरम्यान सरासरी तिकीट दरात 20.5 टक्के घट झाली.
गेल्या वर्षी मात्र तिकीट दर 34.6 टक्क्यांनी वाढले. दिल्ली-बंगळुरू मार्गावरील इकॉनॉमी क्लासचे दर एका वर्षात 53.1 टक्क्यांनी वाढले. याचे कारण म्हणजे 2019 म्हणजे जेट एअरवेज आणि 2023 मध्ये गो फर्स्ट कंपन्यांचे दिवाळं निघालं. स्पाईसजेटनेही आपल्या विमानांची संख्या कमी केली आहे. एअर इंडिया आणि इंडिगो कंपन्यांचे डोमेस्टिक एअरलाईन्स मार्केटवर 90 टक्के प्राबल्य आहे. त्यामुळेच तिकीट दर वाढवले जात आहेत.