… आणि हे निर्लज्ज राजकारणी नौदलावर याचं खापर फोडायचा प्रयत्न करतायत, आदित्य ठाकरे यांचे मिंधे सरकारवर टीकास्त्र

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा अनावरणानंतर अवघ्या आठ महिन्यात पूर्णत: कोसळला. या पुतळ्याच्या दर्जावरून सध्या मिंधे व भाजप सरकारवर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

”आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं. इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे. इथेही कामाचा दर्जा भयानक आहे. इथेही भावनेला नव्हे तर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करण्यात आलंय आणि मग त्यांचे नेहमीचेच ट्रोल्स आणि निर्लज्ज राजकारणी आता दोष भारतीय नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. किती लज्जास्पद आहे हे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.