देशातील जनतेला विकासाचे दिवास्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत अर्धवटस्थितीतील विकासकामांचे उद्घाटन आणि बांधकामाचा निकृष्ट दर्जा यामुळे पायाभूत सुविधांची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. मुंबईतील अटल सेतूला गेलेले तडे, अयोध्येतील राम मंदिर आणि नव्या संसद भवनाला लागलेली गळती, दिल्ली विमानतळाचे कोसळलेले छत यासारख्या वारंवार घडणाऱ्या घटना पाहता मोदींचे ना खाऊंगा आणि खाने दुंगा हेच का, असा संताप सर्वसामान्य करू लागले आहेत.
मोदींचा हातगुण-उद्घाटन केले आणि कुठे पडले, कुठे गळले तर कुठे तडे गेले
अयोध्येतील राम मंदिर
22 जानेवारी 2024 रोजी मोदींच्या हस्ते उद्घाटन
24 जून 2024 रोजी गाभाऱ्यात गळती
राममंदिर उभारणीसाठी 1,400 कोटी खर्च
नवे संसद भवन
28 मे 2023 रोजी उद्घाटन
1 ऑगस्ट 2024 रोजी गळती
संसद भवन उभारणीसाठी 1,200 कोटी खर्च
शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू
12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन
21 जून 2024 रोजी तडे गेले
अटल सेतूवर 17,840 कोटी खर्च
दिल्ली विमानतळ टर्मिनल 1
10 मार्च 2024 रोजी उद्घाटन
28 जून 2024 रोजी छताचा भाग कोसळला
प्रकल्पावर 7,000 कोटी खर्च
गुजरातचे राजकोट विमानतळ
27 जुलै 2023 रोजी उद्घाटन
28 जून 2024 रोजी छताचा भाग कोसळला
प्रकल्पावर 1,240 कोटी खर्च
जबलपूर विमानतळ
10 मार्च 2024 रोजी उद्घाटन
27 जून 2024 ला छत कोसळले
प्रकल्पावर 460 कोटी खर्च
बुंदेलखंड एक्स्प्रेस-वे
16 जुलै 2022 रोजी उद्घाटन
25 जुलै 2022 रोजी तडे
एक्प्रेस-वेसाठी 1500 कोटी खर्च
भारत मंडपम, जी 20
26 जुलै 2023 रोजी उद्घाटन
10 सप्टेंबर 2023 ला पाणी तुंबले
प्रकल्पावर 3,000 कोटी खर्च