डुप्लांटिसने मोडला स्वत:चाच विक्रम

स्वीडनचा बांबू उडीतील स्टार खेळाडू अर्मेण्ड डुप्लांटिस याने यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा स्वतःचाच विक्रम मोडण्याचा विश्वविक्रम केलाय. पोलंडमधील सिलेसिया डायमंड लीगमध्ये त्याने 6.26 मीटर उडी मारून बांबू उडीत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला.

24 वर्षीय अर्मेण्ड डुप्लांटिसने आपला मागील विश्वविक्रम एक सेंटीमीटरने मोडला. त्याने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 6.25 मीटर उडी मारत सुवर्णपदक जिंकताना स्वतःचा पहिला किक्रम मोडला होता. त्याआधी त्याने फेब्रुवारी 2020 मध्ये पोलंडमध्येच 6.17 मीटर उडी घेत पहिला विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी त्याने प्रान्सच्या रेनॉड लॅक्हिलेनी याचा 2014 मधील विश्वविक्रम मोडीत काढला होता.