नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकारने आपल्या कंपन्यांच्या विक्रीची योजना काही काळ स्थगित ठेवली होती. मात्र आता पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांच्या विक्रीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकार 8 पीएसयू कंपन्यांची विक्री करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये बहुतांश खत कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.
पुढील आर्थिक वर्षात ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. 2022 मध्ये नीती आयोगाने धोरणात्मक विक्रीसाठी आठ खत कंपन्यांची निवड केली होती, परंतु सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची विक्री करण्याची योजना थांबवली होती. आता पुन्हा एकदा या कंपन्यांच्या विक्रीसंदर्भात हालचाली होत आहेत.
कोणत्या कंपन्या रडारवर…
ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर, एफसीआय अरावली जिप्सम अँड मिनरल्स लिमिटेड, मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपन्यांचा विक्री यादीत समावेश आहे. याशिवाय गोरखपूर, सिंदरी, तालचेर आणि रामागुंडम येथील फर्टिलायझर्स कॉर्पोरेशनच्या युनिट्सचाही निर्गुंतवणूक यादीत समावेश आहे.
मोदी म्हणाले होते…
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, मैं देश बिकने नही दूंगा… परंतु परिस्थिती बरोबर या उलट आहे. सरकारने सर्वच सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत.