महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी

महिलेचे फोटो व्हायरल करण्याच्या धमकी देऊन घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी हुसेन युसुफ सय्यद राहणार तीन चारी गिरमे वस्ती याला सोमवारी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 32 वर्षीय महिलेने याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते 20 ऑगस्ट 2024 यादरम्यानच्या काळात घडला आहे. पीडित महिला मजुरी काम करीत आहे आरोपी हुसेन याने तिच्याशी ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर हुसेन याने महिलेचा वारंवार पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे पैशाची मागणी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्या घरात घुसला. ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून फिर्यादीचा विनयभंग करून तिला मारहाण केली.

त्यानंतर पीडित महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी हुसेन विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याच्याविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता कलम 74, 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हुसेन सय्यद याला अटक केली आहे. न्यायालय सोमवारी न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी शिक्षा सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पुढील तपास करीत आहेत.