Ratnagiri news: नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा पोलिसांना घेराव; परिचारीकांनी दिला आंदोलनाचा इशारा

ratnagiri-case

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडून तीन तास उलटले तरी आरोपीला न पकडल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी पोलीस निरीक्षकांना घेराव घालून जाब विचारला. तसेच जिल्हा रूग्णालयातील सर्व परिचारिकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. आरोपीला तात्काळ ताब्यात न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.