शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरात आहेत. शहरातील जालना रोडवर असलेल्या हॉटेल रामा येथे आदित्य ठाकरे उतरले आहेत. या हॉटेलच्या गेट बाहेर भाजप कार्यकर्ते सकाळच्यावेळी जमले आणि त्यांनी हुल्लडबाजी केली. भाजप कार्यकर्ते हॉटेल रामाकडे येत असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसैनिक आधीच तयारीत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे रामा हॉटेलच्या गेटजवळ पोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर देऊन भाजपच्या हुल्लडबाज कार्यकर्त्यांना तेथून पिटाळून लावले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली.
मिंधे सरकारच्या पोलिसांनी भाजपच्या चिथावणीखोर कार्यकर्त्यांना बाजुला केले आणि शिवसैनिकांना टार्गेट केले. दरम्यान, या प्रकारनंतर वातावरण आता निवळले आहे. आदित्य ठाकरे नियोजित शिवसंकल्प दौऱ्यास रवाना होत आहेत, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.