पत्नीसह मुलावर लैंगिक अत्याचार; पती, प्रेयसीला अटक

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नी, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार होत असलेल्या वादाचा राग मनात धरून पतीने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी व 13 वर्षीय मुलावर अतिप्रसंग केला. ही बाब उघडकीस येताच शहापूर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून विकृत पती व प्रेयसीला अटक केली आहे.

बदलापूरच्या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतप्त पडसाद उमटले. केवळ सरकारच्या कुचकामीपणामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहापुरातदेखील अशीच घृणास्पद घटना घडल्याचा प्रकार समोर आहे. पत्नी आपल्या प्रेमप्रकरणाला विरोध करते म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी पत्नीचा बलात्कार केला. त्यानंतर या विकृतांनी 13 वर्षीय चिमुकल्यावरही अतिप्रसंग केला.