वीर तसेच उजनी धरण खोऱयात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे दोन्ही धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. रविवारी सायंकाळी वीर धरणातून नीरा नदीत 43 हजार 83 क्युसेक, तर उजनी धरणातून 51 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर, पंढरपूर येथे 50 हजार क्युसेकने विसर्ग वाहत आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. जुना दगडी पूल व भीमा नदीवरील तालुक्यातील इतर 8 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
वीर व उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. मागील चार दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता 43083 क्युसेक सुरू होता. हे पाणी संगम येथे नीरा नदीद्वारे भीमा नदीला मिळत आहे. तर, उजनी धरणातून 51 हजार 600 विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून करण्यात येत असलेल्या विसर्गाचे पाणी पंढरपूर येथे दाखल झाले आहे. रविवारी सकाळी चंद्रभागेतील जुना दगडी पुलावर पाणी आले आहे. चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. तर, काही लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाणी वाढती पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.