टेलिग्राम मेसेजिंग ऍपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह यांना शनिवारी फ्रान्सच्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. पावेल दुरोव्ह आपल्या खासगी विमानातून फ्रान्समध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट देत ताब्यात घेतले. टेलिग्राममध्ये कंटेट मॉडरेटरची कमतरता असल्याची चौकशी फ्रान्स पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलिग्रामवर गुन्हेगारी कृत्य वाढले आहेत.
काय आहे प्रकरण?
दुरोव्ह यांनी विविध देशांतील सरकारांचा दबाव झुगारून लावला. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी कृत्यांसाठी टेलिग्रामचा वापर झाल्याचा आरोप केला जात आहे. कट्टरपंथीय आणि गुन्हेगार टेलिग्रामच्या एनक्रिप्शनशी छेडछाड करून अवैध कामे करत असल्याची टीका होत आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातही टेलिग्रामचा वापर होतोय.