युवारज सिंगचे IPL मध्ये होणार पुनरागन, ‘या’ संघाकडून मिळाली मोठी ऑफर

हिंदुस्थानचा माजी ऑलराउंडर युवराज सिंगने 10 जून 2019 रोजी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे सिक्सर किंग युवराजच्या चाहत्यांमध्ये नाराजीची भावना होती. मात्र आता युवराज सिंग IPL 2025 मध्ये एका नव्या भुमिकेत चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर आणि सिक्सर किंग अशी ओळख असणाऱ्या युवराज सिंगने टी20 वर्ल्ड कप 2007 मध्ये आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकप विजयामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली होती. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सुद्धा त्याने 132 सामन्यांमध्ये 2750 धावा करत 36 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये युवराजने मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, पंजाब किंग्स, RCB, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटस्ल या संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र त्याने 10 जून 2019 रोजी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सने तशी बोलणी युवराज सिंगसोबत सुरू केली आहे. रिकी पॉटिंगने राजीनामा दिल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स हिंदुस्थानी प्रशिक्षकाच्या शोधात असल्याचे संकेत पॉटिंगने दिले होते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक युवराज सिंग असू शकतो.