डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एक तासात आरोपीला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्व येथील आडवली परिसरात एका नराधमाने दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तासाभरात धर्मेंद्र यादव नावाच्या नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी ती अल्पवयीन मुलगी त्या मुलासोबत मुलाच्या घरात गेली. मुलगी घरात येतात मुलाच्या वडिलांनी या अल्पवयीन मुलीला आपल्याजवळ बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मानपाडा पोलिसांनी धर्मेंद्र यादव नावाच्या या नराधमाला अटक केली. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी त्वरित मुलीसोबत मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. घडल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू झाले. त्वरित या प्रकरणात गुन्हा दाखल करीत आरोपी धर्मेंद्र यादव या अटक केली आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने धर्मेंद्र यादव याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मेंद्र याने या मुलीसोबत किंवा आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.