Video – मुलींच्या घोळक्याकडून शाळकरी मुलीला मारहाण, मुंबईतल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

काही मुली एका लहान मुलीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार पाच मुली एका मुलीला पकडून तिला जबर मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबईतला आहे असे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात काही मुली मिळून एका शाळकरी मुलीला जबर मारहाण करत आहेत. या व्हिडीओमध्ये या मुली त्या मुलीला शिव्या घालत असून लाथा बुक्क्यांनी तुडवत आहेत. हा व्हिडीओ अंधेरीच्या वर्सोवाचा असून एका नाना नानी पार्कात ही घटना घडली आहे. कुठल्यातरी वादातून मुलींनी मिळून या मुलीला जबर मारहाण केली आहे.

शब्बीर तांबोळी यानी एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून मुंबई पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलिसांनी या बाबत वरिष्ठांना कळवले आहे.