पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट, दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू; 16 जखमी

पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट झाला असून त्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच सात पोलिसांसह 16 जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात एक महिलेचा आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या स्फोटात 7 पोलिस कर्मचाऱ्यांसह 16 जण जखमी झाले आहे. हा एक दहशदतवादी हल्ला असून याची कुठल्याही संघटनेने अजून जबाबदारी घेतलेली नाही. खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तानच्या पोलिस अधिकारी आणि चौक्यांवर हल्ले होत असतात. जखमींपैकी 13 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका बाईकवर हा बॉम्ब बसवण्यात आला होता. आणि रिमोट कंट्रोलवरून स्फोट करण्यात आला. पाकिस्तानच्या दक्षिण भागातील पोलिस स्थानकाबाहेर हा स्फोट झाला.