पुण्यात पावसाचा कहर, मेट्रो स्टेशनबाहेर साचले पाणी; मुंबईलाही मुसळधार पावसाचा इशारा

पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरात ठिक ठिकाणी पाणी साचले आहे. पुण्यातील मेट्रो स्टेशन बाहेर पाणी साचले असून नागरिकांचे हाल झाले आहेत. तर मुंबईतही मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे पुणे मेट्रो स्टेशनबाहेर पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

मुंबईला इशारा
पुढच्या 24 तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहेत. मुंबईत 30 ते 40 किमी प्रति वेगाने वारे वाहतील. तसेच मुंबईला रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.