टीम इंडियाचा ‘गब्बर’ शिखर धवन याने शनिवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शिखर धवन याने एक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची माहिती दिली. कसोटी, वन डे आणि टी20 या तीनही प्रकारात शिखरने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. वन डे मध्ये सलामीला येत त्याने अनेक सामन्यात विजयाचा पाया रचला. 2013 मध्ये टीम इंडियाने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघातही धवनचा समावेश होता. मात्र गेल्या काही वर्षापासून तो संघाबाहेर होता. कमबॅक लांबल्याने आणि वयही वाढल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याप्रमाणेच टीम इंडियाचे आणखी 11 खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहेत.
पियूष चावला – 35 वर्षीय फिरकीपटू पियूष चावला हा 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या वन डे वर्ल्डकपचा भाग होता. त्यानंतर डिसेंबर 2012 मध्ये त्याने आपला अखेरचा सामना खेळला. 3 कसोटी, 25 वन डे आणि 7 टी20 सामन्यात त्याने अनुक्रमे 7, 32 आणि 4 बळी मिळवले आहेत.
ऋद्धिमान साहा – धोनीच्या निवृत्तीनंतर ऋद्धिमान साहाला टीम इंडियाकडून जास्त संधी मिळाली. अर्थात त्याची कारकिर्द स्पिड पकडू शकली नाही. 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो आपला अखेरचा सामना खेळला. 40 कसोटी आणि 9 वन डे खेळलेल्या सहा 39 वर्षाचा झला असून त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झालेले आहेत.
ईशांत शर्मा – एकेकाळी टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज राहिलेल्या 35 वर्षीय ईशांत शर्माची कारकिर्द जवळपास आटोपली आहे. 105 कसोटी, 80 वन डे आणि 14 टी20 सामने खेळलेल्या ईशांतने कसोटीत 311, वन डे मध्ये 115 आणि टी20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
अमित मिश्रा – डावखुरा लेगब्रेक बॉलर अमित मिश्रा याने अद्याप अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. 2017 मध्ये त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 41 वर्षीय मिश्राने 22 कसोटी, 36 वन डे आणि 10 टी20 सामने खेळले असून 156 विकेट्स घेतल्या आहेत.
करुण नायर – टीम इंडियाकडून कसोटीत विरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणारा 31 वर्षीय करुण नायरही निवृत्तीच्या वाटेवर आहे. 2017 मध्ये त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 6 कसोटी आणि 2 वन डे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले.
जो रूटनं इतिहास घडवला; एकाचवेळी एलन बॉर्डर, राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला
मनीष पांडे – मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू म्हणून पाहिला जाणारा मनीष पांडे मिळालेल्या संधींचे सोने करू शकला नाही. त्याने टीम इंडियाकडून 29 वन डे आणि 39 टी20 सामने खेळले. यात त्याने अनुक्रमे 566 आणि 709 धावा केल्या. 2021 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
ऋषी धवन – हिमाचल प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन टीम इंडियाकडून 3 वन डे आणि 1 टी20 सामना खेळला आहे. मात्र त्याला विषेश कामगिरी करता आली नाही. 2016 मध्ये त्याने अखेरचा सामना खेळला होता.
मोहित शर्मा – आयपीएलमध्ये विकेटची लड लावणारा मोहित शर्मा टीम इंडियाकडून 26 वन डे आणि 8 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 37 विकेट्स घेतल्या. 35 वर्षीय मोहितने 2015 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला संधी मिळण्याचीही शक्यता नाही.
उमेश यादव – विदर्भ एक्सप्रेस नावाने ओखळला जाणारा उमेश यादव बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. जून 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळला होता. 36 वर्षीय उमेशने 57 कसोटी, 75 वन डे आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 170, तर वन डे मध्ये 106 विकेटची नोंद आहे. टी20मध्येही त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
View this post on Instagram
भुवनेश्वर कुमार – स्विगचा किंग समजला जाणारा भुवनेश्वर कुमार गत दोन वर्षापासून टीम इंडियाकडून खेळलेला नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने अखेरचा सामना खेळला आहे. 2013 मध्ये पदार्पण केलेल्या 34 वर्षीय भुवीने 21 कसोटी, 121 वन डे आणि 87 टी20 सामने खेळले. यात त्याने 294 विकेट्स घेतल्या.
जयंत यादव – फिरकी गोलंदाज जयंत यादव याने टीम इंडियाकडून 6 कसोटी आणि 2 वन डे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 16 विकेट्सह 248 धावाही केलेल्या आहेत. 34 वर्षीय जयंत मार्च 2022 मध्ये आपला अखेरचा सामना खेळला होता.