>> अनघा सावंत
सध्याच्या जीवनशैलीत आपण अनेक प्रकारच्या प्रदूषणांना सामोरे जात आहोत. त्यापैकीच एक म्हणजे प्रकाश प्रदूषण. सध्या उद्भवणाऱया डोळ्यांच्या विविध समस्या पाहता प्रकाश प्रदूषण नियंत्रणात ठेवणं आणि त्यापासून सावधगिरी बाळगणं अतिशय आव्हानात्मक ठरत आहे.
मानवी शरीराला लाभलेली सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे डोळे. आजच्या काळात दिवसभर मोबाइल, लॅपटॉप किंवा आयपॅडच्या पीनवर सतत बघून बघून डोळे थकून जातात.
डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच डोळ्यांत कोरडेपणा वाढतो. पीनवर एकटक बघत राहिल्यामुळे डोळ्यांची उघडझाप कमी होते. समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला डेटा आणि माहिती एवढी जास्त असते की, त्यावर आपण काहीही वाचत असतो. लहान मुले तर सातत्याने वेगवेगळे गेम्स खेळत बसतात, व्हिडीओज पाहतात. सेन्सॉर नसल्यामुळे लहान मुलांना नको असलेलेही सहज वाचायला, बघायला मिळते. याविषयी मुंबईतील नानावटी व लीलावती हॉस्पिटलमधले सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. हिमांशू मेहता यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळ्यांपेक्षा मेंदूवर त्याचा जास्त परिणाम होतो. मी मोबाइल वापराच्या चार पायऱया सांगतो. एक म्हणजे योग्य वापर (ळा) जे आपलं कार्यालयीन किंवा व्यावसायिक काम करणं आणि मुलांसाठी म्हणाल तर शाळेचा अभ्यास करणं. दुसरी म्हणजे अतिवापर (ध्नल्sा) आपण घरून काम करणं किंवा मुलांसाठी अधिकचा घरचा अभ्यास करणं. तिसरी आहे गैरवापर (श्ग्sल्sा) म्हणजे चुकीच्या उद्देशाने फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या समाजमाध्यमांचा वापर करणं आणि चौथी आहे दुरुपयोग (Aंल्sा) करणं ते म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म, यूटय़ूब वगैरे. या सर्व गोष्टींमुळे दिवसभर मोबाइल पाहणं चालू राहतं. परिणामी डोळ्यांना अस्वास्थ्याचा सामना करावा लागतो. लहान मुलांना अतिशय लवकर चष्मा लागतो तसंच चष्म्याचा नंबर वाढतो. कमी झोप किंवा झोपेचा विकार, डोळ्यांचे, मेंदूचे विकार याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मोबाइलचा वापर करताना काय करावं नि काय करू नये हे सर्वतोपरी आपल्यावर अवलंबून आहे, असं मी नक्कीच सांगेन.
काही चारचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रखर हेडलाईट्स लावल्या जातात. त्यामुळे समोरून येणाऱया वाहनचालकांच्या तसेच पादचाऱयांच्या डोळ्यांना फार त्रास होतो. अपघाताचीही शक्यता निर्माण होते. रस्ता दिसण्याऐवजी समोरच्या ड्रायव्हरला अंध बनविण्याची ही गोष्ट आहे, असे ते पुढे म्हणाले.
अनेक ठिकाणी मोठमोठे डिजिटल होर्डिंग्ज लावले जातात. ज्यात प्रखर एलईडी लाइट्स असतात, तर काही कार्पामांदरम्यान किंवा मिरवणुकांमध्ये लेझर शो आयोजित केले जातात. याविषयी ते म्हणाले, होर्डिंग्जमधील एलईडीच्या प्रखर प्रकाशामुळेही आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. लेझर शोबद्दल म्हणाल तर लेझर किरणे थेट डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. जर्मनीत कैद्यांना झोपू द्यायचे नसेल तर त्यांच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश टाकून त्यांना झोपू न देणे, अशा प्रकारे टॉर्चर केले जायचे. इथे तर जेलमध्ये न जाताच दिवसभर या-ना-त्या प्रकारे कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहून तुम्ही स्वतच स्वतला टॉर्चर करत आहात. परिणामी झोप नाही आली की, मायग्रेनचा हल्लाही निश्चित होऊ शकतो. रात्री शांत झोप लागावी म्हणून आपण पडदे लावतो, लाइट बंद करतो, फोन बाजूला ठेवतो. म्हणजेच सर्व प्रकारची उत्तेजित करणारी यंत्रणा बंद करतो. त्यामुळे आपणच आपली योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
मोठमोठय़ा कार्पामांदरम्यान किंवा स्टेज शोदरम्यान प्रखर हॅलोजन किंवा इतर तेजस्वी लायटिंग, डिस्को लाइट्स अनेकांना खूप त्रासदायक होतात. हे लाइट्स डोळ्यांना सहन होत नाहीत आणि डोळ्यांतून पाणी येते. डोळे लाल होतात. प्रत्येक माणसाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकालाच हे लाइट्स सहन होतीलच असे नसते. उन्हात जाताना सूर्यकिरणांच्या प्रखरतेचा त्रास होऊ नये म्हणून आपण आवर्जून गॉगल लावतो. कारण आपल्या डोळ्यांची आपल्याला काळजी असते. अगदी तसंच कार्पाम, उत्सव हे होतच राहणार. आपण जग बदलू शकत नाही. मात्र जगाशी जुळवून घेत आणि त्याचबरोबरीने आपली काळजी घेत आपल्या जीवनशैलीला जे योग्य आहे तेच अवलंबत आपण जगलं पाहिजे, असे मत डॉ. हिमांशू यांनी व्यक्त केले.
सध्या इतर प्रदूषणांबाबत होणाऱया जनजागृतीप्रमाणेच प्रकाश प्रदूषणाबाबतही आजच्या डिजिटल युगात जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.
सार्वजनिक गोष्टींवर आपले नियंत्रण नाही पण आपण आपली काळजी निश्चितच घेऊ शकतो. जगाशी जुळवून घेत, त्याचबरोबरीने आपली काळजी घेत आपल्या जीवनशैलीला जे योग्य आहे तेच अवलंबत आपण जगलं पाहिजे. तसंच आजूबाजूच्या लोकांना प्रकाश प्रदूषणाविषयी माहिती देऊन ते कमी करण्यासाठी प्रोत्साहित करा.
– डॉ. हिमांशू मेहता, नेत्रतज्ञ