पवई येथे आरे वसाहतीजवळच्या गौतम नगर परिसरात तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठी गळती लागली. याची माहिती मिळताच जल अभियंता खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. दुरुस्तीचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असले तरी दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी पाहता एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्या, शनिवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
एच पूर्व विभाग
वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा येथे पाणीपुरवठा बंद राहील.
जी उत्तर विभाग
धारावी येथे पाणीपुरवठा बंद राहील.
एस विभाग
गौतम नगर, जयभीम नगर येथे पाणीपुरवठा बंद राहील. तर फिल्टर पाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, पैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेललगतचा परिसर येथे पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
के पूर्व विभाग
प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी 1/2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (अंशतः) , मुपुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापपंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम.आय.डी.सी. परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे.बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर, सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी.एन.टी. वसाहत, मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग, मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) मार्ग क्रमांक 1 ते 23, ट्रान्स अपार्टमेंट, काोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज, ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साई नगर, सहार गाव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल येथे पाणीपुरवठा बंद राहील.