
भायखळा येथे आज भयानक घटना घडली. माथेफिरू तरुण एका खासगी शिकवणीत घुसला आणि त्याने तेथील दोघा लहान मुलांवर हल्ला केला. भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत. ओरिसाचा असलेला एक 30 वर्षीय तरुण भायखळ्यातील इमारतीत घुसला होता. तो विकृत चाळे करू लागल्याने नागरिकांनी त्याला हाकलले व त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच तो पळत तेथील हेरंबदर्शन इमारतीत गेला आणि तेथील एका घरात घुसला. तिथे एक महिला दोन मुलांची खासगी शिकवणी घेत होती. तो तरुण थेट स्वयंपाक घरात गेला आणि चाकू घेतला.
लोक पकडून मारतील म्हणून त्याने घरातील टीव्ही, काचा फोडल्या. त्याने मुलांच्या गळ्यावर वार केला. सुदैवाने फार दुखापत झाली नाही. मात्र त्या माथेफिरू तरुणाने एका मुलाला पकडून दरवाजाला आतून कडी लावून घेतली. भायखळा पोलिसांनी खिडकीतून घरात घुसून त्या माथेफिरू तरुणाला पकडले. लेंबाता असे त्याचे नाव असल्याचे समजते.