
गुंतवणूकदारांना फटका; 42 हजार कोटी पाण्यात
अमेरिकेत होणाऱ्या जॅक्सन होलच्या बैठकीआधीच हिंदुस्थानी शेअर बाजार आज किरकोळ वाढीसोबत बंद झाला. सेन्सेक्समध्ये अवघ्या 33 अंकांची किरकोळ वाढ झाली, तर बीएसईचे मिडपॅप इंडेक्स 0.66 टक्के घसरणीसह बंद झाले. स्मॉलपॅप इंडेक्समध्ये 0.16 टक्के वाढ दिसली. एकंदरीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना शुक्रवारी जोरदार फटका बसला असून गुंतवणूकदारांचे जवळपास 42 हजार कोटी रुपये पाण्यात गेले. सर्वात जास्त घसरण रियल्टी, आयटी आणि ऑइल अँड गॅसच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 33 अंकांच्या वाढीसोबत 81,086 अंकांवर बंद झाला. निफ्टी 11.65 अंकांच्या वाढीसोबत 24,823 अंकांवर बंद झाला. लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन शुक्रवारी 460.10 लाख कोटी रुपयांवर आले. गुरुवारी 460.52 लाख कोटींवर होते, तर बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्पेट कॅप जवळपास 42 हजार कोटी रुपयांनी घसरले.
बम्बल झेप्टोसोबत
बम्बल या डेटिंग अॅपने झेप्टो कंपनीसोबत भागीदारी केली. या भागीदारीमुळे बंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि पुण्यामधील वापरकर्त्यांना फायदा होईल. या वेळी बम्बलच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या संचालिका ल्युसिल मॅककार्ट उपस्थित होत्या.
सेन्सेक्स आणि निफ्टीत किरकोळ वाढ
सेन्सेक्सच्या 30 शेअर्समध्ये 17 शेअर्स वाढीसोबत बंद झाले. यात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 1.58 टक्के सर्वात जास्त वाढ झाली. सन फार्मा, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व, आयसीआयसीआय बँकचे शेअर्स वाढीसोबत बंद झाले, तर 13 शेअर्समध्ये घसरण झाली. यात टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, टायटन आणि इन्पहसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
ट्रिबेका डेव्हलपर्स
ट्रिबेका डेव्हलपर्स आणि तेजुकाया यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘द एज’ या प्रकल्पाला अवघ्या 30 दिवसांत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री केली आहे. ज्यामुळे हा दक्षिण मुंबईतील सर्वात जलद विकला जाणारा प्रकल्प बनला आहे.
लेक्सलेगीजचा नवा मंच
लेक्सलेगीज या लीगल टेक सोल्यूशन्स एंटरप्राइझने लार्ज लैंग्वेज मॉडल लाँच करण्याची घोषणा केली. कर आणि कायदेसंबंधी व्यावसायिकांना या लीगल एआय मंचाचा उपयोग होणार आहे. लेक्सलेगीजचे संस्थापक, सीईओ साकार एस. यादव या वेळी उपस्थित होते.
महाराजा कंपनीची नवी अगरबत्ती
महाराजा अगरबत्ती कंपनीने काश्मिरी लव्हेंडर आणि प्युअर बकुर प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा कंपनीची अगरबत्ती खरेदी करताना कंपनीचा लोगो पाहून खरेदी करावे असे कंपनीने म्हटले आहे. महाराजा कंपनीची अगरबत्ती प्रत्येक अगरबत्तीच्या दुकानात तसेच महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्प, रोड क्र. 4 दादर, मुंबई-28 येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – 8369185071.
ओएनडीसीचे फक्त 6 मिनिटांत कर्ज
ओएनडीसी ओपन नेटवर्कने आता कर्ज देण्यास सुरुवात केली असून अवघ्या 6 मिनिटांत संपूर्ण डिजिटल, पेपरलेस कर्ज सुविधा सादर केली आहे. या वेळी ओएनडीसीचे एमडी आणि सीईओ टी. कोशी उपस्थित होते. कर्ज देणाऱ्यांत आदित्य बिर्ला फायनान्स, डीएमआय फायनान्स आणि कर्नाटक बँकेचा समावेश आहे. ही नवीन डिजिटल कर्ज प्रक्रिया सुलभतेने आणि झटपट कर्ज देऊन मोठा प्रभाव निर्माण करणार आहे. ओएनडीसी नेटवर्कची सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत जीएसटी इनव्हॉईस फायनान्सिंग कर्ज सुरू करण्याची योजना आहे.
फ्लिपकार्टचा करार
फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन ऑपरेशन्स अकादमीने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून देशातील हजारो रोजगारक्षम युवकांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हीना अगरबत्ती आणि धूप बाजारात!
निखिल प्रोडक्टस् बंगळुरूच्या अगरबत्ती कंपनीने श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी या सणांचे औचित्य साधून केसर चंदन धूप आणि लोबन धूप बाजारात आणले आहे. केसर चंदन धूप आणि लोबन धूप नैसर्गिक सुगंधी द्रव्य व हलमडीपासून तयार करण्यात आले आहे. 20 ग्रॅम (105 रुपये) आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 8655766778.
ऑक्सिस कंझम्पशन फंड
ऑक्सिस म्युच्युअल फंडाने ऑक्सिस कंझम्पशन फंड सुरू करण्याची घोषणा केली. या नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांपेक्षा अधिक असणार आहे. अर्जाची किमान रक्कम 100 रुपये आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत असणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन हितेश दास, श्रेयस देवलकर आणि पृष्णा नारायण (ओव्हरसीज सिक्युरिटीजसाठी) हे करणार आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा विस्तार
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (उत्कर्ष एसएफबीएल) मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे नवी शाखा उघडली आहे. या नव्या शाखेसह बँकेच्या महाराष्ट्रात 76 शाखा झाल्या आहेत, तर देशभरातील शाखांची संख्या 931 झाली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखा मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.