कॅनेडियन फर्म लुकारा डायमंडच्या कैरोच्या खाणीत 2492 कॅरेटचा हिरा सापडला आहे. हा हिरा जगातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा आहे. 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या 3106 कॅरेट कलिनन हिऱयानंतरचा हा सर्वात मोठा हिरा आहे. गॅबोरोनपासून सुमारे 500 किमी अंतरावर आहे. यापूर्वी 2019 मध्ये याच खाणीत 1758 कॅरेटचा सावेलो हिरा सापडला होता. तसेच त्याआधी 2017 मध्ये 1111 कॅरेटचा लेसेडीला रोना हिरा बोत्सवानाच्या कैरो खाणीत सापडला होता. हा हिरा एका ब्रिटिश ज्वेलरने 444 कोटी रुपयांना विकत घेतला होता. बोत्सवाना जगातील सर्वात मोठय़ा हिरे उत्पादकांपैकी एक आहे. जगातील 20 टक्के हिरे या ठिकाणी बनवले जातात. नव्या कायद्यानुसार परवाना मिळाल्यानंतर खाण कंपन्यांना स्थानिक गुंतवणूकदारांना 24 टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे.
– आम्ही या शोधामुळे खूप आनंदी आहोत. आमच्या मेगा डायमंड रिकव्हरी एक्स-रे तंत्रज्ञानाच्या मदतीने या हिऱयाचा शोध लागला आहे. आम्ही हा 2492 कॅरेटचा हिरा कोरण्याचा प्रयत्न करत आहोत, असे लुकारा डायमंड फर्मचे प्रमुख विल्यम लॅम्ब यांनी म्हटले आहे.